जाहिरात... Advertisement... विज्ञापन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदान करत वाहिली आदरांजली.(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
राजुरा : वंचित बहुजन आघाडी तालुका राजुरा शाखेच्या वतीने क्रांतिसूर्य शिक्षणाचे महामेरू ज्योतिबा फुले व बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून महमानवांना आदरांजली वाहण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुपर मार्केट, असिफाबाद रोड राजुरा येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराच्या आयोजनासाठी अमोल राऊत यांनी मुख्य भूमिका पार पाडली. या शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवांना आदरांजली वाहिली.
भव्य रक्तदान शिबिराला वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, प्रसिद्धी प्रमुख अमोल राऊत, जिल्हा सचिव रमेश लिंगंमपल्लीवार, जिल्हा सदस्य भगीरथ वाकडे, तालुका अध्यक्ष सुशील मडावी, उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, महासचिव रविकिरण बावणे, महासचिव सदानंद मडावी, सुरेंद्र फुसाटे, राहुल अंबादे, रवी झाडे, धनराज उमरे, उत्कर्ष गायकवाड, आकाश नळे, सुभाष हजारे, जमाते इस्लामी हिंद राजुरा चे पदाधिकारी, हजरत टिपू सुलतान फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून  उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुळमेथे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक जाधव, डॉ. बांबोळे, धनंजय वाघ, डॉ. गावित, जय पचारे, विजय निवलकर व संपूर्ण चमू रक्तदान शिबिराला उपस्थित राहून सहकार्य केले. मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन एक्याची भूमिका दर्शविली हे विशेष! ऋणानुबंध चिरंतर टिकून राहावे अशी सदिच्छा शिबिराचे मुख्य संयोजक अमोल राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत