Top News

नवजात बाळाच्या आईसाठी रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी पुरविले रक्त #Jivati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- चंद्रपूर येथिल डॉक्टरांनी बाळाच्या आईची तपासणी केली आणि सांगितल कि बाळाच्या आईला तातडीने रक्ताची गरज आहे. व्यवस्था करा. रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी या बाळाच्या आईसाठी रक्त उपलब्ध करून त्याने त्या नवजात बाळाच्या आईचे प्राण वाचवले.
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल भागातील मुरलीगुडा, ता.राजुरा ते महिला या नवीन अपरिचित ठिकाणी यांचे कोणीच ओळखीचे नाही आणि अचानक डॉक्टरांनी रक्ताची व्यवस्था करणाचे फर्मान सोडले. त्यानी रक्तासाठी काही परिचितांना फोन केले. शेवटी यांची असहायता बघून सी. आर. पी. फ सुनिल चव्हाण यांनी येथील रुग्णसेवक जिवन तोगरे यांच्या भ्रमध्वनीचा क्रमांक दिला व स्वतः फोन करून सर्व परिस्थितीचे कधन केले त्या नवजात बाळाच्या आईचा नातेवाईकांनी फोन केला.
जिवन तोगरे यांनी त्यांना सर्वप्रथम शासकीय रुग्णालय चंद्रपूरच्या ब्लड बँकेत पाठविले व भ्रमणध्वनीव्दारे तेथील रक्तकोष विभागाच्या डॉक्टरांशी संपर्क साधला परंतु दुर्दैवाने ब्लड बँकेत ए-बी निगेटिव्ह या रक्तागटाची एकही पिशवी उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रश्न निर्माण झाला. आता ते नवजात बाळाचे नातेवाईक व वडिल घाबरलं. त्या बाळाच्या पालकांनी पुन्हा जिवन तोगरे यांच्याशी संपर्क साधला. जिवन यांनी चंद्रपूर येथील संजीवनी ब्लड बँकेशी संपर्क साधून तातडीने रक्ताची व्यवस्था करुन दिली संजीवनी ब्लड बँकेतून शासकीय रुग्णालय चंद्रपूरच्या रुग्णालयात हे रक्त पोहोचले. तातडीने ते त्या नवजात बाळाच्या आईला देण्यात आले. रक्त आणावे कुठून, त्यासाठीच्या पैशाची तजवीज कशी करावी? या विवंचनेत असणाऱ्या या नवजात बाळाच्या आईचे नातेवाईकांना सुखद धक्का होता. बाळाच्या आईला जीवदान मिळावे म्हणून असहाय होऊन अनेकांसमोर हात जोडून रक्तदान करण्याची विनंती करीत होते आणि कोणतीही ओळख नसताना अपरिचित जिवन तोगरे यांनी त्या नवजात बाळाच्या आईला नवजीवन देण्यात मोलाची भूमिका निभावली त्या हातमजुरी करणार्‍या गरीब कुटुंबांना जिवन तोगरे यांच्या रुपात देवदूत भेटला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने