Top News

ट्रक ने दुचाकी ला उडवले #accident

एकाचा जागेवर मृत्यू तर एक जखमी

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा अंतर्गत सोंडो गाव येथे दि. 17 एप्रिलला दुपारच्या सुमारास सोंडे गावाजवळील पुलाजवळ एक मोठ्या ट्रकने दुचाकी वाहन ला धडक बसल्याने एकाचा जागेवर मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना घडली
🎉
मृतक आकाश मारोती दोहे. वय 13 वर्ष . व दुसरा नागेश मोहन आदे. मु.पो. सोणूर्ली जखमी झाला. जखमी व्यक्तीला राजुरा उप जिल्हा रुग्णालय भरती करण्यात आले. नागेश हा सोनुर्ली वरून देवाडा ल काही सामान खरेदी करण्यासाठी जात असताना आकाश त्याचा सोबत दुचाकी वाहन वरती सोबत निघाला होता आणि लगेच काही अंतरावरती पुलिया जवळ अपघात घडला.
🎉
आकाश जागीच मृत पावला. व नागेश हा ट्रकच्या मागे लटकून गाडी पकडण्यासाठी राजुरा पर्यंत लटकून गेला. व राजुरा ला नागरिकांनी गाडी थांबवून चालकाला पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिला.
🎉
घटनास्थळी विरूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल चव्हाण व कर्मचारी माणिक वागादरकर, मेजर दिवाकर पवार, मेजर विजय मुंडे, अतुल साहरे यांनी मोका पंचनामा करून मृतकाचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने