दिव्यांगांच्या निधीचे चेक पोहोचले घरपोच #Jivati #chandrapur


प्रहार चे रुग्णसेवक जिवन तोगरे यांच्या प्रयत्नाला यश
जिवती:- जिवती तालुक्यातील अपंग बांधवांना कार्यालय गाठण्यास त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून चक्क भारी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विवेक तितरे यांनी अपंग निधी चे चेक त्याच्या घरी जाऊन वाटत केल्याने अपंग बांधवांनी ग्रामसेवक तितरे यांचे आभार मानले व ग्रामपंचायत च्या इतिहासात अनेकदा चकरा मारून सुद्धा निधी मिळत तर या वेळेस चक्क घरपोच निधी आल्याने अपंग बांधव आनंदित झाले. ग्रामपंचायत अंतर्गत भारी 1 व 2, चीलाटी गुडा , मच्छीगूडा, कामतगुडा, येरवा, लखमापूर, कमलापुर येथील अंगांवडींना 8 टेबले,व 8 चेअर 10 % महिला बाल कल्याण शिर्षखाली सामान्य फंडातून देण्यात आले.व सात अपंग बांधवांना प्रति २२५० रुपये देण्यात आले स्थानिक ग्रामपंचायतला येणाऱ्या उत्पन्नातून दिव्यांगाना पाच टक्के अर्थसाहाय्य करणे याबाबत शासनाचा आदेश असताना अनेक स्थानिक ग्रामपंचायतीने दिव्यागांना आजपर्यंत कधीच निधी खर्च केले नव्हते मात्र प्रहार संघटनेच्या प्रयत्नामुळे येथील सात दिव्यांगाना भारी ग्रामपंचायतने यांनी अर्थसहाय्य केले आहे.
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून ग्रामीण भागातील दिव्यांगांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न केले. यावर शासनाचे निर्णय घेऊन स्थानिक ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या उत्पनावरुन दिव्यागांना पाच टक्के आर्थिक मदत करावी असा आदेश काढला. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी या आदेशाकडे कानाडोळा केला मात्र, स्थानिक प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जीवन तोगरी यांनी दिलेल्या निवेदनाची दखल येथील ग्रामपंचायत विवेक तितरे यांना घेण्यात भाग पाडले. ग्रामपंचायत मधिल ०७ दिव्यांग बंधुना २२५० रुपये प्रमाणे धनादेश देण्यात आले यावेळी विवेक तितरे ग्राम विकास अधिकारी,राजेंद्र बांबोळे आरोग्य विस्तार अधिकारी,सतीश कोटनाके ,नारायण शेंडे,मंगेश कोटनाके व समस्त अंगणवाडी सेविका,मदतनीस व गावकरी मंडळी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत