आयसीआयसीआय फौंडेशन अंतर्गत तालुका निहाय मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न #sindewahi

Bhairav Diwase
0
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- आयसीआयसीआय फाऊंडेशन व व्हिजन स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, सावली, नागभीड व चिमूर तालुक्यातील ५५ प्रकल्प गावांमध्ये २२४८-पुरुष व १९६८-महिलांचे असे एकूण ४२१६ लाभार्थीचे निशुल्क डोळे(नेत्र) तपासणी शिबीर घेण्यात आले व अल्प दरात २२२१ लाभार्थीना चष्मे देखील वाटप करण्यात आले.
आयसीआयसीआय फाऊंडेशन वन्य जीवन प्रकल्प अंतर्गत सिंदेवाही, सावली, ब्रम्हपुरी, नागभीड व चिमूर या तालुक्यातील १०० गावांमध्ये शाश्वत उपजीविका उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील लोकांची डोळ्यांची समस्या उपजीविकेचे अडसर होऊ नये याकरिता प्रकल्प गावात निशुल्क डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराची सुरवात सिंदेवाही तालुक्यातील सरडपार या गावापासून करण्यात आली व सांगता सावली तालुक्यातील चारगाव या गावात करण्यात आली. व्हिजन स्प्रिंग समुहाने प्रकल्प गावागावात जाऊन संपूर्ण डोळे तपासणी शिबीर उत्तमरीत्या पार पाडले.
संपूर्ण शिबीर आयसीआयसीआय फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक श्री.नवीन कपुर, विकास अधिकारी गिरीश निर्वाण, हार्दिका मेहता, रिटा हटवार, मयुर येवला व समनव्यक यांच्या निदर्शनाखाली करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)