Top News

शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या #suicide



(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- तालुक्यातील हरांबा येथील शेतकऱ्याने सततच्या नापिकी व विविध बँकेच्या कर्जामुळे नैराशेतू गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ओमदेव तिवाडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक ओमदेव तिवाडे यांचे हरांबा शिवारात 8 एकर शेती आहे. त्यांच्याकडे मध्यवर्ती बँक व आय डी बी आय बँक येथील थकीत कर्ज आहे. IDBI बँक चे 1,33,000 व सेवा सहकारी सोसायटी 2,00,000 व इतर खाजगी कर्ज मिळून जवळपास 5,00,000 रुपयाचे कर्ज डोक्यावर होते. शेतात सतत नापिकी होत असल्याने कर्ज कसे फेडावे यात ते सतत विवंचनेत राहायचे. कुटुंबातील पाच ते सहा जणांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. तसेच 2 मुलांना शिक्षण, शेतात उत्पन्न नाही, हातात काहीच नसल्याच्या आर्थिक विवंचनेत तिवाडे कुटुंब होते. नापिकीने आर्थिक तंगी, कर्ज फेडीसाठी शेती जप्ती होईल या भीतीच्या विवंचनातून त्यांनी काल गुरुवारी टोकाचे पाऊल उचलत शेतातच गळफास घेऊन • आपली जीवन यात्रा संपवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई बाबा आहेत. अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ केली जात आहे. मराठवाडा व महाराष्ट्रच्या इतर भागातील शेतकरी आत्महत्येचे लोन आता धानपट्ट म्हणजेच पूर्व विदर्भात ही पसरल्याचे चिन्ह दिसून येत आहे.शासनाने तात्काळ तिवाडे कुटुंबियांना मदत करावी अशी गावकरी मागणी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने