Top News

ऑफलाईन परीक्षेसाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ #Mumbai #Maharashtra #offline


मुंबई:- कोरोना महामारीने सगळ्या जगाला वेठीस धरले होते. या काळात विद्यार्थ्यांचे वर्ग आणि परीक्षा या ऑनलाईन घेण्यात आल्या. दरम्यान आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आनंदाचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांचा लिहीण्याचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती, दर्यान कुलगुरूंच्या बैठकीत विद्यार्थ्यांना प्रतितास १५ मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च तंत्रज्ञज्ञान शिक्षणमंत्री उदय सामंत यानी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती, ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफ लाईन परीक्षेसाठी वेळ वाढून द्यावी ही मागणी प्रामुख्याने युवा सेनेने केली होती, असेही त्यांनी सांगितले. ऑफलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना या वाढवून मिळालेल्या वेळेचा नक्कीच फायदा होईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने