Click Here...👇👇👇

सहाय्यक प्राध्यापक ओमप्रकाश सोनोने आचार्य पदवीने सन्मानित #pombhurna

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, पोंभुर्णा येथील सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले ओमप्रकाश सोनोने यांना संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती ने आचार्य पदवी देऊन सन्मानित केले. त्यांचा संशोधनाचा विषय पश्चिम विदर्भाच्या नगरपरिषदातील कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळावरील गुणवत्तेवर प्रशिक्षणाचा होणारा परिणाम हा होता. यात त्यांनी बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे कार्यस्थळावरील गुणवत्तेचा अभ्यास केला आहे. सदर संशोधन नगर परिषद प्रशासन संचलनालय, पुणे यांना सुधारणांकरिता सादर करणार असल्याची माहीती प्राचार्य संघपाल नारनवरे यांनी दिली.
सदर संशोधन डॉ. सुष्मा देशमुख, महीला महाविद्यालय अमरावती यांच्या मार्गदर्श्नाखाली पुर्ण केले आहे. आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे सचिव स्वप्नील दोंतुलवार, अध्यक्ष सौ. वृषाली दोंतुलवार व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नारनवरे, सहकारी प्रा. उपरवट, प्रा. बुधे, डॉ. मेश्राम व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.