Click Here...👇👇👇

कनिष्ठ लिपिक पावडे बाबू यांचा निरोप समारंभ #Rajura

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित गुरुनानक विद्यालय विरुर स्टेशन येथील पि. व्ही. पावडे हे कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होते. दिनांक 31/3/2022 ला कार्यकाळ संपल्याने यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील, प्रमुख पाहुणे कोंडलकर सर, साईनाथ विद्यालय कडोली येथील मुख्याध्यापक गिरडकर सर , मालेकर सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक, धानोरकर सर, विठ्ठलजी पावडे, रामचंद्र पावडे, उपस्थित होते.
पि.व्ही.पावडे कनिष्ठ लिपिक व त्यांच्या पत्नी सौ सविता ताई पावडे यांचा सर्व शिक्षक व संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन
कु. हुलके मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक चुनारकर सर यांनी केले आभार प्रदर्शन कु. सोयाम मॅडम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता चुनारकर सर, बेले सर, उराडे सर शिपाई गेडाम यांनी सहकार्य केले.