Top News

सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य करा #bhadrawati

ग्राहक पंचायत भद्रावती यांची मागणी

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती : महाराष्ट्र राज्य शासनाच्या सन 2020 च्या अधिनियम क्रमांक 3 नुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अधिनियम 2020 असे नाव या अधिनियमास देण्यात आले आहे. परंतु काही शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे ग्राहक पंचायत भद्रावती यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा चंद्रपूर, जिल्हा अधिकारी चंद्रपूर, शिक्षण अधिकारी चंद्रपूर यांना पत्र देऊन जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन अनिवार्य करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
सध्या जिल्हा परिषद शाळा वगळता उर्वरित अनुदानित किंवा विना अनुदानित अथवा कायमस्वरूपी विना अनुदानित बऱ्याच शाळांमध्ये मराठी भाषा शिकविली जात नाही. महाराष्ट्र राज्याची बोली भाषा मराठी ही सर्व शाळांमध्ये पहिली भाषा असलीच पाहिजे.
आपल्याकडे असणाऱ्या किंडरगार्टन, प्री स्कूल, कॉन्व्हेंट या सर्व खाजगी शाळांमध्ये हिंदी आणि इंग्रजी याच दोन भाषा प्रामुख्याने शिकवली जाते. महाराष्ट्राची मायबोली असणाऱ्या मराठी भाषेलाच आपल्या शाळांमध्ये स्थान दिले जात नाही. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी केली जाते, महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांमध्ये व्यवहारी आणि बोलीभाषा मराठी सक्तीची करतात शिवाय महाराष्ट्रातील संपूर्ण दुकानाच्या नावांचा पाट्या या मराठी मध्येच असले पाहिजे अशी सक्ती केली जाते. त्याच महाराष्ट्रात नवीन पिढीला शाळेत प्रवेश घेतल्यानंतर मराठी भाषा शिकवली जात नाही, हे मात्र आश्चर्य करणारे आहे.
महाराष्ट्राची भाषा मराठी ही टिकविण्यासाठी भविष्यात मोठा लढा द्यावा लागू नये, याकरिता ग्राहक पंचायत भद्रावती यांनी किंडरगार्टन, प्रीस्कूल, कॉन्व्हेंट या शाळेपासूनच मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन नवीन शैक्षणिक वर्षापासून अनिवार्य करावे. अशी मागणी माननीय मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपुर, मिताली सेठी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी चर्चेस ग्राहक पंचायत भद्रावती चे पदाधिकारी वामन नामपल्लीवार, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे आणि प्रविण रामचंद्र चिमुरकर यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने