Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

श्री. संत शिरोमणी गुरू रविदास महाराज मंदिर लोकार्पण तथा मूर्ती स्थापना सोहळा #bhadrawati

विविध कार्यक्रमांचे आयोजन
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती येथे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज मंदिर लोकार्पण तथा मूर्ती स्थापना सोहळा आ. प्रतिभाताई धानोरकर, व माधाव गायकवाड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, संभाजी वाघमारे, सुभाष भटवलकर, हरीश घोरे, प्रणय बसेशंकर, सुषमा खंडाळे, कीर्ती पवार, रामकृष्ण मेंढे, विनोद खंडाळे, रवींद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
संत शिरोमणी गुरू रविदास महाराज महिला मंडळ द्वारा संचालीत दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात पहिल्या दिवशी स्वच्छता अभियान अंतर्गत परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर संत शिरोमणी गुरू रविदास महाराजांच्या मूर्तीची शहरातील प्रमुख मार्गाने पालखी काढण्यात आली. व ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. व सायंकाळी कु. साक्षी अतकरे यांचे कीर्तनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले.
दुसऱ्या दिवशी आ. प्रतिभाताई धानोरकर, व माधव गायकवाड, संभाजी वाघमारे यांच्या हस्ते मंदिर लोकार्पण तथा मूर्ती स्थापनेचा मुख्य सोहळा पार पडला. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील महिला व बचतगट पदाधिकारी व सदस्यांनी तथा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत