Top News

रासेयो शिबिरातून युवकांचा विकास शक्य: अल्का आत्राम #NSS #pombhurna


छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे उद्घाटन
पोंभुर्णा:- कविलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेके, जिल्हा नागपूर द्वारा संचालीत छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा, चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांचे ग्रामीण शिबिर व रासेयो शिबिराचे उमरी पोतदार येथे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी अध्यक्ष म्हणून मा. सुधाकरराव खरवडे यांनी शिबिरार्थ्यांशी संवाद साधतांना रासेयो विद्यार्थी शाश्वत विकास,समृद्ध गाव व समृद्ध भारत हा विचार या शिबिराच्या माध्यमातून पुढील दिवसात मांडेल. रासेयो शिबिरातील विद्यार्थ्यांनी गावातील युवक आणि बचत गटाच्या महिलांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचा विकास साधणे शक्य आहे असे प्रतिपादन केले. शिबिर दिनांक 30 मार्च 2022 ते 5 एप्रिल 2022 या कालावधीत पार पडणार आहे .


 उद्घाटन प्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून मा. सुधाकरराव खरवडे उपस्थित होते. तसेच माजी सभापती अल्का आत्राम, उमरी पोतदार ग्रामपंचायत च्या सरपंचा सौ. ठामेश्वरी लेनगुरे उपसरपंच मंगेश उपरे , माजी सरपंच मनोज मुलकलवार, बंडू लेनगुरे , तंटामुक्ती समिती अध्यक्ष संदीप मडावी, भास्कर लांडे यांची उपस्थिती होती.
शिबिराचे संयोजक म्हणून महाविद्यालयाचे प्रा. स्नेहल राऊत, प्रा.रमेश बोंडे यांच्या मार्गदर्शनात पुढील पाच दिवस हे शिबिर उत्साहात पार पडावे यासाठी गावकऱ्यांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन पाहणारे डोळे आणि मदतीचे हात, बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अंकुश उराडे यांनी केले.
या उद्घटकीय कार्यक्रमाचे संचालन तुषार पोहिनकर यांनी केले. प्रास्तावीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास ढोणे यांनी तर उपस्थितांचे आभार संकेत घाटे यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयाचे शिबिरार्थी, गावकरी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने