जाहिरात... Advertisement... विज्ञापन

महिंद्रा होम फायनान्स कंपनीच्या कार्यालयात तरुणाची गळफास घेत आत्महत्या #Suicide

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गोंडपिपरी:- तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ताे राेखपाल म्हणून ड्युटीवर हाेता, त्या महिंद्रा होम फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच त्याने गळफास घेतला. ही घटना रविवारी उघडकीस आली.
कपिल वराते (२८, रा.चेकदरूर, ता.गोंडपिपरी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कपिल हा गोंडपिपरी येथे महिंद्रा होम फायनान्स कंपनीमध्ये रोखपाल पदावर कार्यरत होता. नुकतेच त्याचे लग्न जुळले असून, १५ मे रोजी त्याचा लग्नसोहळा आयोजित केला होता. रविवारी तो एका लग्नसोहळ्यासाठी वरोरा येथे गेला होता. तेथून परत आल्यानंतर कार्यालयाला सुट्टी असतानाही त्याने महिंद्रा होम फायनान्स कंपनीचे कार्यालय गाठले. तेथेच गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती ठाणेदार जीवन राजगुरू यांना मिळताच, त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी वराते याचा मोबाइल जप्त केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळले नसून, पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत