Top News

चंद्रपुरात ही 3 तास बंद राहणार ट्रपिक सिग्नल #chandrapur


चंद्रपूर :- नागपूर नंतर चंद्रपुरात ही दुपारी 3 तास सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद होत आहे. प्रामुख्याने चंद्रपुरात मागील काही दिवसांमध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे.
चंद्रपुरात मागील काही दिवसातील सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. यामुळे नागरिक वाढत्या उष्णतेमूळ त्रस्त झाले आहेत. मात्र या उन्हाच्या तडाख्यापासून वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना दिलासा मिळावा यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरातील चौकांमधील सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेन्यात आला. विशेषतः सिग्नलवर थांबल्यावर याचा अधिक त्रास होतो. हाच त्रास वाचण्यासाठी आता चंद्रपूर शहरात दुपारी 1 ते 4 या वेळेत सिग्नल बंद असणार आहेत. वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी सामना शी बोलताना माहिती दिली.
आणखी काही दिवस हे उच्चांकी तापमान राहणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता शहरात दुचाकीस्वारांना प्रवास करताना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने