कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा कणा:- डॉ.मंगेश गुलवाडे #chandrapur

Bhairav Diwase
बंगाली कॅम्प येथील महिलांचा भाजपा मध्ये प्रवेश
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी मध्ये महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व महानगर सचिव रामकुमार आक्केपेल्लीवार यांच्या पुढाकाराने बंगाली कॅम्प येथील महिलांचा भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश चा कार्यक्रम पार पडला.
 यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की भाजप चा कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा कणा असून तो कार्यकर्ता नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो व नागरिकांच्या सतत संपर्कात असतो असे त्यांनी यावेळी सांगितले सदर पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा महानगर सचिव रामकुमार आक्केपेल्लीवार यांनी पक्षप्रवेश केलेल्या महिलांचे स्वागत केले व पक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी महिलांना दिली.
 सदर पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी रामजी लखीया,भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री ब्रिजभुषण पाझारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर पक्षप्रवेश केलेल्या महिलां मध्ये आष्टभुजा वार्ड बंगाली कॅम्प येथील राणी रॉय,सरिता मेहता,बेबी रॉय,सरिता रॉय,सीमा प्रजापती,विद्या उराडे,इतीमा देबनाथ,गीता नाकाडे,कविता सरदार,सुशीला पोत्तदार,कल्याणी मंडल,ममता बिस्वास, रंजू गुप्ता, कमलाप्रसाद बिस्वास,शीला उके,रमा पुलकर यांचा समावेश होता....