तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या इसमावर रानगव्याचा हल्ला #pombhurna

कसरगट्टा बिटातील कक्ष क्रमांक ९२ मधील घटना
पोंभूर्णा:- #पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कसरगट्टा बिटातील जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या इसमावर रानगव्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. सदर घटना शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान घडली. रुषी कावरू देवगडे वय ५० वर्ष असे जखमी इसमाचे नाव आहे. #Pombhurna
शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान बोर्डा बोरकर येथील रूषी देवगडे आपल्या पत्नीसह कसरगट्टा बिटातील जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेले होते. तेंदुपत्ता तोडत असताना मागाहून येत असलेल्या रानगव्याने रूषीला उचलून खाली आपटलं. व गंभीर जखमी केले. #Adharnewsnetwork
सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून जखमीला तात्काळ पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत