Top News

भाकरीने त्यांचा संसारात वाढविला गोडवा... #Gondpipari


चंद्रपूर:- भाकर तशी गोड. अनेकजन चवीने भाकर खातात. याच भाकरीने आर्थिक स्थितीमुळे कडवट झालेल्या पोहनकर यांच्या संसाराला गोंडवा बहाल केला. गोंडपिपरी शहरातील शरद पोहनकर यांची सतरा वर्षापुर्वी पानटपरी होती. याच टपरीवर दोन मुलं, पती -पत्नी यांच उदर्निवाह चालायचं. पानटरीतून अल्प मिळकत व्हायची. या अल्प मिळकतीत संसाराचा गाडा ओढतांना पोहनकर पती-पत्नीची मोठीच घालमेल व्हायची.सारख्या आर्थिक चणचणीमुळे शरद मानसिक दबावात असायचे. यातून मार्ग काढण्यासाठी शरदने तहसिल,पंचायत समिती परिसरात चंद्रपूर -अहेरी मार्गावर निर्मल झूनका भाकर केंद्र उघडले. चवदार, रूचकर भाकर मिळत असल्याने ग्राहकांची गर्दी होवू लागली.
गोंडपिपरी हे तालुक्याच स्थळ. विविध कामे घेऊन नागरिक गोंडपिपरीला येत असतात.भुख लागली कि आवडीने झूनका भाकरीचा स्वाद घेतात. 25 रूपये प्लेटचा नास्ता खाण्यापेक्षा 25 रूपयात येणाऱ्या दोन भाकरी खाण्याकडे ग्राहकांचा ओढा असतो. भाकरीतून बर्यापैकी मिळकत पोहणकर यांना होत असते. शरद पोहनकर आणि त्यांचा पत्नी विभाताई हे दोघे मागील सतरा वर्षापासून झूणका भाकर केंद्र चालवित आहेत. कधी आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटूंबाला भाकरीनं आज सावरलं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने