तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलीचा हल्ला #pombhurna


पोंभूर्णा :- #बल्लारपूर वनपरिक्षेत्र, अंतर्गत येत असलेल्या सातारा भोसले बिटातील जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलीने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. सदर घटना शनिवारी सकाळी ७.०० वाजताच्या दरम्यान घडली. मुर्लीधर पुणाजी पेंदोर वय ४५ वर्ष असे जखमी इसमाचे नाव आहे. #Pombhurna
शनिवारी सकाळी ७.०० वाजताच्या दरम्यान लक्ष्मणपूर डोंगर हळदी येथील मुर्लीधर पेंदोर सातारा भोसले बिटातील जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेला होता. तेंदुपत्ता तोडत असताना अस्वली‌ने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. #Adharnewsnetwork
सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.जखमीला तात्काळ पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत