बापाने केला मुलीच्या डोक्यावर लोखंडी सबलीने जोरदार प्रहार #chandrapur #saoli #saolinews


सावली:- तालुक्यातील बोथली येथील एका मद्यधुंद व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलीवर झोपेतच डोक्यावर लोखंडी सबलीने जोरदार प्रहार केला यात ती गंभीर जखमी झाली असून सोबतच असलेल्या महिला नातलगाला डोक्याला जबर घाव बसला यात ते गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ४ एप्रिल चा रात्रौ असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
बोथली येथील बंडू कवडू पुलावर वय 47 वर्ष खाजगी वाहन चालक असून नेहमी वाहन चालवतांना बाहेरच असतो अशा तर त्याच्या नातलगांचे गावातच लग्न असल्याने सर्व नातलग घरी मुक्कामी होते त्यात लहान मुलीचे गावातीलच एका मुलासोबत लग्न जुळले याला विरोध असल्याच्या रागाच्या भरात सर्व झोपल्या नंतर दरवाजाची कडी काढून झोपली असलेल्या मुलीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला सोबत झोपलेली बहिणीची सासू इला पण डोक्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली आरोपीची मुलगी अंकिता बंडू पुलावर वय 24 वर्षे व आरोपी शकुंतला नंदु नंदनवार वय ७2 अशी गंभीर जखमी ची नावे आहेत.
दोघांनाही रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी प्रथम सावली रुग्णालयात नेण्यात आले परंतु परिस्थिती गंभीर असल्याने मुलीला गडचिरोली रुग्णालयात हलविण्यात आले तिथून नागपूर रेपर करण्यात आले तर चुलत सासूला प्रथम चंद्रपूर सामान्य रुग्णालयात इथून नागपूर हलवण्यात आले आहे सावली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशीकर चिचघरे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत