तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वलांच्या कळपाचा हल्ला #gadchiroli

४ महिला गंभीर जखमी
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
कुरखेडा:- तेंदूपत्ता संकलनाकरिता जंगलात गेलेल्या महिला मजुरांवर अचनाक अस्वलांच्या कळपाने हल्ला चढविला. ही घटना आज(दि. ७) सकाळी ७ च्या सुमारास घडली असून यात ४ महिला मजूर गंभीर झाल्या आहेत.
कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील महिला-पुरुष अशा १४ जणांचा गट गावापासून ५ किमी अंतरावर असलेल्या कवऱ्याल झट्याल जगंलात तेंदूपत्ता संकलनाकरीता गेले होते. संकलनाचे काम सूरू असतानाच अचानक ५ च्या संख्येत असलेल्या अस्वलाचा कळपाने या मजुरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सिमा रतिराम टेकाम (२१), लता जिवन मडावी (३५), पल्लवी रमेश टेकाम (२५) व रमशीला आनंदराव टेकाम (३८) या चार महिला गंभीर जखमी झाल्या.
दरम्यान, आरडाओरड ऐकताच आसपासचे मजूर मदतीला धावून आले व अस्वलांच्या कळपाने घटनास्थळावरून पळ काढला. सर्व जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रामगडचे वनरक्षक बि.डी. रामपूरकर मालेवाडाचे वनरक्षक बाबूराव तुलावी, डी.एम. उईके यांनी रुग्नालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली व नियमाप्रमाणे उपचारार्थ आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत