चंद्रपूर:- चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर येथे अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. अजयपूर गावाजवळ काल रात्री 2 ट्रकमध्ये भीषण अपघात झाला होता. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली होती. अपघातानंतर भीषण आग लागल्याने ट्रकचे टायर फुटल्याने आग भडकली होती.