धर्मवीर चित्रपटात हूबेहूब आनंद दिघे साहेबांच चित्र पहायला मिळाले. प्रसाद ओक यांनी केलेल्या भूमिकेतून दिघे साहेब स्वतः असल्याचं जाणवले. गुरूपाैर्णिमेला त्या काळात गुरूचे दर्शन घेणे, ते शिवसैनिक करायचे. गुरूदक्षिणा कशी घ्यायची आणि श्रध्दा, निष्ठा कशी ठेवायची, हे पहायला मिळाले.
शिवसेनेने कसे काम केले हे आपल्याला पहायला मिळते. सर्व शिवसैनिक गुरूपाैर्णिमेला साहेबांना भेटत होते, आता त्याच्यानंतरही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांनाही भेटतो. कट्टर शिवसैनिक शिवसेनेसाठी, पक्षासाठी काय करतो हे पहायला मिळते.
शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित झाला असून शिवसैनिकांसह लोकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक यांनी साकारली आहे. तर एकनाथ शिंदे यांचाही जीनवपट या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. आनंद दिघे यांच्या जीवनातील अनेक घडामोडी चित्रपटात दाखविण्यात आलेल्या आहेत.
त्यावेळच्या कठीण प्रसंगी शिवसेनेचे काम करणारे एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, दादा भुसे, राजन विचारे या सर्वांच्या कार्याचे कौतुक केले. धर्मवीर आनंद दिघे यांनी एकनिष्ट राहून शिवसेना संघटन वाढवले. यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट बघून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यापासून बोध घ्यावा आणि आपले कार्य उंचवावे असे आवाहन त्यांनी केले.
पण एकूणच धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचा परिणाम फारच सुंदर आहे. हा चित्रपट प्रत्येकाने एकदा तरी बघायलाच हवा. खूप दिवसांनी इतका सुंदर आणि आपल्याला खूप काही देऊन जाणारा चित्रपट सिनेमागृहात जाऊनच बघायला हवा....
Official trailer.....
Song videos...