Click Here...👇👇👇

मराठी चित्रपटातील अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा.

Bhairav Diwase
राजुरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ,माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळे यांनी सोशल मीडियावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करून त्याचा अपमान केला. यापुढे पुन्हा असा प्रकार घडू नये याकरिता अभिनेत्रीचे फेसबुक पेज , ट्विटर, इंस्टाग्राम, कायमस्वरूपी ब्लॉक करावे व तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राजुरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. बहादुरे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले .

यावेळी उपस्थित राजुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रखिब शेख, विजेएनटि चे तालुकाध्यक्ष जहिर खान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संदिप पोगला, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुजित कावळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर महासचिव राहुल वनकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.