विठ्ठलवाडा-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे #gondpipari

Bhairav Diwase
ए. जी कंन्ट्रक्शनच्या कामाची चौकशी करा; शिवसेनेची मागणी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यात सर्व बाजूने रस्त्याच्या बांधकामाचा धडाका सुरू आहे.अशातच तालुक्यातील विठ्ठलवाडा ते आष्टी मार्गाच्या रस्त्याचे अंदाजे ४५ कोटी रुपयांचे बांधकाम ए. जी कंट्रक्शन औरंगाबादच्या कंपनीकडून काम सुरू आहे.या कामात अनेक बाबी संशयास्पद आढळल्याने शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कंपणीच्या कॅम्प वर हजारो ब्रास रेतीसाठा साठवणूक केला असून यांच्या कडे परवाना किती.सोबतच रस्त्यावर २४ तास मुरूम टाकणे सुरू असून मुरूम अवैद्य वापरल्या जात आहे.पर्यायाने शाषणाचा महसूल बुळत आहे.कामाच्या महत्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने अनेक अपघात घडत आहे.काही ठिकाणी रस्ता खोदून त्यात मुरूम गिट्टी वापर तर काही ठिकाणी आवश्यक तितका रस्ता न खोदकाम करता मुरूम गिट्टी टाकून रात्रीचा फायदा घेत काम करण्यात येत आहे.सर्व कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,तुकाराम सातपुते,विवेक राणा,बालू झाडे,शुभम भोयर यांनी केली आहे.
रस्त्यावर वापरण्यात आलेला मुरूम किती त्यांना परवाना किती आहे याची चौकशी करन्यात येईल. सोबतच साठवणूक केलेल्या रेतीचा पंचनामा करून परवाना तपासण्यात येईल दोषी आढळल्यास कारवाई करू
के.डी मेश्राम तहसीलदार, गोंडपिपरी