बिबट्याचा धावत्या पेपर गाडीवर हल्ला, चालक थोडक्यात बचावला #Leopard

Bhairav Diwase

कुरखेडा:- धावत्या दुचाकी वाहनावर बिबट्याने उडी मारून केलेल्या हल्ल्यात वाहन चालकाच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही घटना मंगळवारी कुरखेडा-वडसा मार्गावर सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने वाहन नियंत्रित ठेवल्याने मोठा अपघात टळला

कोरची मार्गावर बिबट्याने हल्ला करून एक दुचाकीस्वाराला जखमी केले. आज पहाटे बिबट्याने नागपूरवरून गडचिरोली कोरचीकडे येणाऱ्या पेपर गाडीवर हल्ला केला. या पेपर गाडीच्या चालकाला उजव्या बाजूला दुखापत झाली असून गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक उपचार करून नागपूर येथे पुढील उपचारासाठी या चालकाला पाठवण्यात आले आहे.