Top News

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामुळे मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यास मदत होईल:- सुरज परसुटकर (Physical Education Teacher) बजाज विद्या भवन स्कुल चंद्रपूर #chandrapur


चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे उन्हाळी योगा व क्रीडा प्रशिक्षण शिबिर (निशुल्क प्रवेश) दिनांक ०१ मे २०२२ ते ३१ मे २०२२ पर्यंत येथे आयोजित करण्यात आले आहेत. तसेच बजाज विद्या भवन स्कुल येथे दि. ५ मे ते ५ जून पर्यंत उन्हाळी योगा व क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. सन 2019 ते 2022 जानेवारी महिन्यापर्यंत कोरोनाचे संकट उभे होत याकाळात मुलांचे खेळणे घराबाहेर निघणे कठीण झाले होते. जसे उडणाऱ्या पाखरांचे पंख छाटलेल्या सारखे झाले होते आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पुन्हा क्रीडा क्षेत्राला गती मिळाली यात काही शंका नाही कोरोना कालखंडात शालेय विद्यार्थ्याचे शैक्षणिक व क्रीडा प्रकाराच्या बाबतीत प्रचंड नुकसान झाले विद्यार्थ्यांच्या शारीरिक नुकसान तर झालेच मोबाईलच्या अधिक वापरामुळे मानसिक क्षमतेवर सुद्धा प्रचंड आघात झालेला दिसून येत आहे.

या काळात मुलांच्या मानसिक ताण तणाव अधिक वाढला, आळशीपणा वाढला, नको त्या वयात मोबाईलचा चांगला वाईट दोन्ही परिणाम दिसून आले अशा अनेक समस्या कोरोना काळात बालका समोर निर्माण झाल्या त्या समस्या दूर करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक क्षमतेच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा गुणांच्या विकासासाठी मूलभूत असा कार्यक्रम राबवणे महत्वाचे झाले आहे. असे सुरज परसुटकर यांनी म्हणाले.
सन 2022 या शैक्षणिक वर्ष दरम्यान सुरु होणाऱ्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सामाजिक संघटना खेल संघटना व शासनाच्या वतीने क्रीडा प्रशिक्षण शिबिरे आयोजित केले जात आहे. हे उपक्रम खेळाडूंच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता शारीरिक व मानसिक क्षमतेच्या विकासासह सांग स्वरूपाची बांधील की खेळात निर्माण होईल या हेतूने विविध खेळातील खेळाडूंना एकत्र येत शालेय उपक्रम राबवण्यात येत विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राविषयी अधिक आपुलकी निर्माण होण्यास मदत होईल.

त्याच बरोबर चंद्रपूर शहरातील क्रीडा संस्कृती अधिक प्रभावी व्हावी यासाठी पालकांचा क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला असल्यामुळे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर नव संजीवनी ठरेलं, क्रीडा संस्कृतीला गतिशील अशी चालना मिळेल व उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर यामुळे मुलांमध्ये खेळाचे महत्व लक्षात येईल. मुल व मुलींना मैदानावर येण्याची आवड निर्माण होईल याचा सर्वात मोठा फायदा या क्रीडा शिबिरामुळे होत असतो. असे सुरज परसुटकर यांनी आधार न्युज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने