Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राजुराची कार्यकारणी गठीत.

अध्यक्ष पदी ॲड. राहुल थोरात, सचिव रत्नाकर पायपरे तर कार्याध्यक्ष पदी सतीश शिंदे यांची निवड.


राजुरा:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ स्तरीय अधिवेशन नागपूर येथील वनामती सभागृहामध्ये संपन्न झाले होते. त्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा राजुराचे अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल थोरात यांची प्रदेशाध्यक्ष मा. वसंत मुंडे साहेबांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राजुरा अध्यक्ष पदी आधार न्युज नेटवर्क मुख्य उपसंपादक ॲड. राहुल थोरात, सचिव पदी आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी रत्नाकर पायपरे, संघटक पदी आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी जगतसिंग वधावन यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....     त्यानंतर दि. १ मे २०२२ रोज रविवारला सकाळी १०:३० वाजता साई हॉटेल राजुरा येथे राजुरा तालुका पत्रकार संघाची सभा संपन्न झाली. सभेमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा राजुराची कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्याप्रसंगी पदाधिकारांना मार्गदर्शक प्रा. अनंत डोंगे सर व अध्यक्ष ॲड. राहुल थोरात यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. 


कार्यकारणीमध्ये सचिव रत्नाकर पायपरे, कार्याध्यक्ष सतीश शिंदे, उपाध्यक्ष प्रवीण मेकर्तीवार, उपाध्यक्ष संतोष मेश्राम, संघटक जगतसिंग वधावन, कोषाध्यक्ष राकेश कलेगुरवार, सहसचिव संजय रामटेके, प्रसिद्धी प्रमुख अनिलकुमार गिरमिल्ला, प्रेस फोटोग्राफर रुपेश वाटेकर, सदस्य- संतोष देरकर, उज्वल भटारकर, वैभव धोटे, लोकेश पारखी, ओंकार आस्वले, कैलास कार्लेकर, अंकुश भोंगळे, गौरव कोडापे यांची नियुक्ती करण्यात आली.


      पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे व जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे यांनी पत्रकार संघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत