राजुरा नेफडो तर्फे सिडबॉल निर्मिती उपक्रम संपन्न.

Bhairav Diwase
 सदावर्ते दांपत्याने कुंड्या, बिस्किट, खाऊचे वाटप व वृक्षारोपण करून केला लग्नाचा वाढदिवस साजरा.
- सीडबॉल द्वारे "नेफडो राजुरा"  शब्द लेखन.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात 
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने सीडबॉल निर्मिती उपक्रम आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथील प्रांगणात घेण्यात आला. नेफडो चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला.


    यावेळी राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या नागपूर विभाग अध्यक्षा अल्का सदावर्ते, नेफडो चे चंद्रपूर जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी दिलीप सदावर्ते, जिल्हाध्यक्ष संतोष देरकर, सांस्कृतिक विभाग अध्यक्षा रजनी शर्मा, विलास कुंदोजवार, नरेंद्र देशकर, पूर्वा देशमुख, बबलू चव्हाण, रुपेश चिडे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, उमेश लढी, राजश्री उपगन्लावार, सुनीता कुंभारे , नितीन जयपुरकर आदिसह आदर्श हायस्कुल शाळेतील राष्ट्रीय हरीत सेने च्या विध्यार्थीनि उपस्थित होत्या.


 यावेळी दिलीप सदावर्ते व अल्का सदावर्ते यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस नेफडो संस्थेला कुंड्या भेट देऊन विध्यार्थी ना बिस्कीट व खाऊ चे वाटप तसेच वृक्षारोपण करून साजरा केला. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या वतीने सदावर्ते दांपत्याला भेटवस्तू देण्यात आली. सिडबॉल निर्मिती उपक्रमात विविध प्रकारच्या झाडाच्या बियांचे संकलन करून त्या बिया काळी माती, शेण व गांडूळ खत यांच्या मिश्रनाणे तयार करण्यात आले. तसेच या तयार झालेल्या सीडबॉल च्या साह्याने
 " NEPHDO RAJURA " नेफडो राजुरा असे शब्द लेखन करण्यात आले. या सीडबॉल चा वापर प्रवास करीत असताना बिजारोपण करिता होणार असून या द्वारे वृक्षारोपनाचे पवित्र कार्य आपल्या हातून घडणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.