जिल्ह्यात चक्रीवादळाचा कहर #gadchiroli

Bhairav Diwase
गडचिरोली:- जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी पावसामुळे सिरोंचा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली. वादळाचा वेग इतका होता की समोरचे काहीच दिसत नव्हते. अनेक भागात वीज पुरवठा ठप्प झाला आहे.




अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने मुख्यालयातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रामंजपूर येथील पेट्रोल पंपचे मोठे नुकसान झाले आहे.
सिरोंचा तालुक्यात २४ मे रोजी ४ वाजताच्या सुमारास अचानक चक्रीवादळ व अवकाळी पावसाचा आगमन झाला. यात लोकांना काही कळायचं आधीच या चक्रीवादळाने रौद्ररूप धारण करून होत्याचं नव्हतं केलं. जवळपास २० ते ३० मिनिट चक्रीवादळ सुरू होते.त्यात अनेक घरांवरचे छप्पर उडाले, रस्त्यावरील टिनाचे शेड उडाले,मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली.एवढेच नव्हेतर सिरोंचा तालुका मुख्यालयात असलेले पेट्रोल पंपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 सध्या चक्रीवादळ आणि पाऊस थांबले असलेतरी,तालुका मुख्यालयसह आणखी बरेच गावात नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. नेमकं किती नुकसान झालं हे अद्यापही कळू शकले नाही. मात्र,जिल्ह्यातील केवळ सिरोंचा तालुक्यात याचा खूप मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. चक्री वादळाने सिरोंचा तालुक्यातील बहुतांश गावात मोठे नुकसान झाले.ठिकठिकाणी विजेच्या तारांवर मोठमोठे झाड कोसळल्याने तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला आहे. राज्याचे हवामान खात्याने काल सोमवारीच वादळाचा इशारा दिला होता. त्यानंतर आज सिरोंचाला सर्वाधिक फटका बसला.