Top News

राजुरा विधानसभा क्षेत्रातील स्थानिकांना कंपनीमध्ये सर्वप्रथम प्राधान्य द्या- श्री. सुरज ठाकरे



राजुरा:- सविस्तर वृत्त असे की राजुरा विधानसभा क्षेत्रांमधील असंख्य सुशिक्षित बेरोजगार तरुण तथा अनुभवी ड्रायव्हर्स व हेल्पर्स यांच्यामध्ये कौशल्य असुन देखील हे सर्व सद्यस्थितीत बेरोजगार आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण चार तालुके आहेत ज्यामध्ये राजुरा, कोरपणा, गोंडपिपरी, जिवती हे आहेत. यातील कोरपना तालुक्यातील पेनगंगा ओपन कास्ट माईन, गाळेगाव ता. कोरपना या खदानी चा उत्खननाचा व ट्रांसपोर्ट चा ठेका हा मान इंजिनियर कंपनीला नव्याने मिळालेला आहे.
याआधी हा ठेका ए एस डी सी गोलछा या कंपनीकडे होता, जो आता संपुष्टात आलेला आहे. ज्याप्रकारे ए एस डी सी गोलछा कंपनीने आतापर्यंत कामगारांच्या बाबतीतली कुठलीही समस्या असल्यास त्या सोडविण्याकरिता तथा स्थानिकांना कंपनीमध्ये सामावून घेण्याकरिता जय भवानी कामगार संघटनेला त्यांनी ज्या प्रकारे सहकार्य केले त्याच प्रकारे मान इंजिनीअरिंग कंपनीने सुद्धा राजुरा विधानसभा क्षेत्रातील स्थानिक बेरोजगारांना कंपनीमध्ये सर्व प्रथम प्राधान्य देऊन सामावून घेण्यात यावे याकरिता आज दिनांक:- २६/०५/२०२२ ला पेनगंगा ओपन कास्ट माईन येथे त्याच कंपनीमधील सध्या स्थितीत असलेले काही जुने बेरोजगार कामगार व स्थानिक बेरोजगार तरुण यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये रोजगार मिळण्याकरिता निवेदन दिले. जय भवानी कामगार संघटनेची हे प्रामुख्याने कामगारांच्या रोजगारा संदर्भात स्थानिकांना सर्वप्रथम प्राधान्य देणेबाबत मागणी आदी ही होती व भविष्यातही राहील व कंपनी प्रशासनाकडून कामगारांचे शोषण न व्हावे याकरिता संबंधित प्रशासनाची लढा हा सुरूच राहील.! बेरोजगारांनी असे ठणकावून सांगत यावेळेस जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात कंपनीला तरुणांनी निवेदन दिले. यावेळेस उपस्थित बेरोजगार तरुण आशिष कुचनकर, नितेश वासेकर, गणेश सुरणार, आशीष आगरकर, प्रथमेश वानखेडे, अविनाश वाघमारे, प्रशांत बुरान, गौरव पाचभाई, अनिकेत जुनघरे, विनोद बुरडकर, आशिष ठाकरे, नितेश गुरनुले, शंकर उरकुडे आदी बेरोजगार कामगार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने