प्रथमेश तांबेकर यांचा वाढदिवस चुनाळा येथील गोरक्षण केंद्र तथा छात्रावास येथे संपन्न.

नेफडो च्या कॅप, बिस्कीट, पेन व बर्ड फिडर देऊन केला वाढदिवस साजरा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा सचिव सुनैना तांबेकर यांच्या मुलाचा प्रथमेश तांबेकर यांचा वाढदिवस चूनाळा येथील गोरक्षण केंद्र तथा छात्रावास या ठिकाणी विध्यार्थीना नेफडो च्या कॅप, बिस्कीट, पेन व त्या परिसरात पक्षां करिता बर्ड फिडर लावून साजरा करण्यात आला.


यावेळी बादल बेले, विलास कुंदोजवार, सुनैना तांबेकर, सुनीता उगदे, सुरेंद्र उगदे आदिसह गोरक्षण केंद्र तथा छात्रावासातील विध्यार्थी व प्रथमेश चे मित्र परिवार यांची उपस्थिती होती.


प्रथमेश व त्याच्या परिवाराने वाढदिवस हा चुनाळा येथील गोरक्षण तथा छात्रावासातील मुलांसोबत साजरा करताना एक वेगळा आनंद व समाधान मिळत असल्याचे मत व्यक्त केले. तर आपण ज्या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे कामं करतो त्याचा प्रसार, प्रचार व सामाजिक कार्य हे जनसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे व सर्वांनी पर्यावरण संवर्धन आणी मानवता विकासाच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलून सामाजिक बांधीलकी जोपासली पाहिजेत असे प्रतिपादन बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत