Top News

नारंडा येथे ५८ रक्तदात्यांनी केले रक्तदान #blooddonation


सरपंच सौ. अनुताई ताजने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरपना तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यलयाच्या विद्यमानाने व दालमिया भारत फाऊंडेशन यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिराचे उद्घाटन नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई ताजने यांच्या हस्ते करण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील रक्तपेढ्यामध्ये रक्ताची कमतरता भासत आहे तरी सदर रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी कोरपना व जिवती येथील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिथाली शेठी यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिराला तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,डॉ.दीक्षा ताकसांडे,डॉ.सुबोध गोडबोले,डॉ.हेमा सोनकुसरे,दालमिया फाऊंडेशनचे लक्ष्मण कुडमेथे,गौरव वांढरे,निलेश साउरकर यांची उपस्थिती होती.

    सदर शिबिरात ५८ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेले आपले सामाजिक ऋण फेडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला.तसेच या ठिकाणी दालमिया सिमेंट कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसेच नारंडा व परिसरातील गावातील नागरिकांनी रक्तदान करून प्रशासनास सहकार्य केले.त्याबद्दल आरोग्य विभागाने त्यांचे आभार व्यक्त केले.तसेच यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने