Top News

पोंभूर्ण्यात २७ रक्तदात्याने केले रक्तदान #blooddonation

पोंभूर्णा:- प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा यांच्यावतीने ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे २७ मे ला रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात २७ रक्तदात्यांने स्वेच्छेने रक्तदान केले. 🌄
 यावेळी शासकीय महाविद्यालय चंद्रपूर येथिल रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांच्या मार्गदर्शनात समाजसेवा अधीक्षक संजय गावित, रक्तकेंद्र वैज्ञानिक अधिकारी जय पचारे, सहाय्यक चेतन वैरागडे व रूपेश घुमे उपस्थित होते. 
🌄 जिल्ह्यात अनेक गंभीर रूग्णांना रक्ताची गरज असते. रक्ताची मागणी वाढत असल्याने व उन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या कमी झाली असल्याने रक्तपेढीत रक्तसाठा कमी आहे. रक्तामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहेत. पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यात २७ रक्तदात्यांने रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. 🌄
 शिबिराच्या यशस्वीतेकरिता तालूका आरोग्य अधिकारी पोंभूर्णा डॉ.संदेश मामिडवार,पोंभूर्णा वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिकेत गेडाम, वैद्यकिय अधिकारी डॉ. वंदना बावणे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सहाय्यक राजेश कानेटकर, आरोग्य सहाय्यक प्रदिप गोर्लावार,सातर , पिंपळशेन्डे, पारधी, राहुल वासेकर, वैभव उराडे, गौरव पेन्दोर, कोसमशिले,भंडारे, सपना कोतपल्लीवार, रोशनी आईटलावार,अनुराधा झॉ, जयश्री तुम्मे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने