Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

पोचूगुडा ग्रामस्थांना प्यायला पाणी नाही दोन दिवसाच्या आत नळयोजना चालू करा अन्यथा तीव्र आंदोलन करू-सुदामभाऊ राठोड #jiwati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील खडकी हिरापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारा पोचूगुडा गाव पाण्यापासून तहानलेला , गावात नळ योजना तर आहे पण नळात पाणी नाही ग्रामस्थांनी 2 महिन्यापासून ग्रामसेवकाला सांगत आहे .
तरी ग्रामसेवक त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या कामात मस्त आहे आणि गावकरी मात्र पाण्यापासून वंचित आहे ,पोचूगुडा गावातील लोकांना एक घागर पाणी घेण्यासाठी विहिरीवर दिवस भर उन्हामध्ये थांबावं लागत आहे ही फार गंभीर परिस्थिती येथील लोकांची आहे जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड व युवा आघाडी तालुकाध्यक्ष रामेश्वर पोले यांनी गावात जाऊन भेट दिल्यानंतर तेथील ग्रामसेवकाला फोन करून सांगितलं तेव्हा ग्रामसेवकांनी बुधवार पर्यंत मोटरचे काम करून नळ चालू करून देण्याचे आश्वासन सुदामभाऊ राठोड यांना दिला आहे.
 बुधवार पर्यंत नळ चालू न झाल्यास जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदामभाऊ राठोड यांनी ग्रामसेवकाला दिला आहे.यावेळी विदर्भ राज्य युवा आघाडी जिवती तालुकाध्यक्ष रामेश्वर पोले ,जय विदर्भ पार्टी जिवती तालुकाध्यक्ष रियाजभाई सय्यद, विदर्भ सोशल मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल राठोड उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत