Top News

सरदार पटेल महाविद्यालय येथे नेटबॉल स्पर्धा संपन्न #chandrapur #netball

7 स्टार टिमने पटकाविला प्रथम क्रमांक

चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे उन्हाळी योगा व क्रीडा प्रशिक्षण शिबिर (निशुल्क प्रवेश) दिनांक ०१ मे २०२२ ते ३१ मे २०२२ पर्यंत येथे आयोजित करण्यात आले आहेत.  

आज दि. २९ मे ला सरदार पटेल महाविद्यालय येथे नेटबॉल स्पर्धा संपन्न झाली. आज सकाळपासून नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सुमारास ६ टिम ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टिम, C.R स्टार टिम, शिवनेरी टिम, 7 स्टार टिम, शिकारी टिम, C. R. 7 टिम मैदानात उतरले होते. 

शिवनेरी टिम, 7 स्टार टिम, शिकारी टिम, C. R. 7 टिम या ४ टिम सेमीफायनल ला पोहोचले. यात स्पर्धेत चौथे बक्षीस C. R. 7 टिम, तिसरे बक्षीस शिकारी टिम, दुसरे बक्षीस शिवनेरी टिम तर प्रथम बक्षीस 7 स्टार टिम या टिमने पटकाविले.

या स्पर्धेचे आयोजन डॉ. विजय सोमकुंवर, डॉ. कुलदीप गोंड, प्रमुख उपस्थिती बाळुभाऊ बावणकर, प्रशिक्षक म्हणून सुरज परसुटकर,  नितीन घरत, चेतन इदगुरवार, दुषाण चन्ने, सागर परचाके, चिराग फालके उपस्थित होते.

प्रथम बक्षीस 7 स्टार टिम

दुसरे बक्षीस शिवनेरी टिम 

तिसरे बक्षीस शिकारी टिम

चौथे बक्षीस C. R. 7 टिम


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने