Top News

पाटण येथील सरकारी दवाखाना की गुरांचा गोठा? #Jiwati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अस्वच्छ, जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड व विदर्भ युवा आघाडी जिवती तालुकाध्यक्ष रामेश्वर पोले यांनी दवाखान्यात जाऊन बघितल्यावर पाटण येथील आरोग्य कर्मचारी यांना चांगलंच सुनावलं तुम्ही पगार घेत नाही आहे का दवाखान्याय चपराशी, सफाई कामगार नाही का असा प्रश्न केला आणि दवाखाना तुरंत साफ करा स्वच्छ ठेवा नाहीतर आंदोलन करू असा इशारा दिला.
येथील वासघणामुळे दवाखान्यात जाणारा पेशंट ५० टक्के आजारी असेल तर ८० टक्के आजारी होऊन चालले एवढि अस्वछता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसून येत आहे, आणि पाटण लागत प्राथमिक आरोग्य केंद्र हिरापूर दखतर आहे ते चार वर्षे झाले तेथे नर्स नाही तेथे पण घाणीच साम्राज्य आहे, गावात दवाखाना असून तेथील गोरगरिबांना दुसऱ्या गावाला जाव लागते, मग हे सरकारी दवाखाने नुसते नावालाच का असा प्रश्न जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी केला आहे.
हिरापूर येथील दखतर मध्ये तुरंत एका नर्सला जॉईन करून दखतर चालू करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सुदामभाऊ राठोड यांनी केला आहे यावेळी युवा आघाडी तालुकाध्यक्ष रामेश्वर पोले, जय विदर्भ पार्टी तालुकाध्यक्ष रियाजभाई सय्यद, विदर्भ सोशल मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल राठोड उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने