Top News

झाडे कुटुंबियांच्या मदतीला धावले "देवराव" #chandrapur #bhadrawati

भद्रावती:- तालुक्यातील कर्नाटक एम्टा परिसरात टँकर पलटून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोज बुधवारला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.
कर्नाटक एम्टा कोळसा खदान मधून होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे रोडवर धूळ निर्माण होते. प्रदूषण होऊ नये व इतर वाहनचालकांना त्रास होऊ नये म्हणून टँकरने पाणी मारण्याचे कंत्राट येथील राजू ढेंगळे यांना मिळाले. त्यांचे टँकरवर खुशब झाडे ३९ ( हल्ली मुक्काम कोंढा ) हे चालक म्हणून कार्यरत होते. ०४ मे बुधवारला नेहमी प्रमाणे टँकर भरून रोड वर पाणी मारत असताना चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटले आणि टँकर रोड खाली जाऊन पलटी झाला. यात चालक दाबल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतकाला ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे हलविले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघात ड्युटीवर झाल्याने मोबदल्याची मागणी जोर धरू लागली. जो पर्यंत मृतकाच्या कुटुंबियांना मदत मिळत नाही तो पर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही असा निर्णय आप्तेष्टांनी घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मृतक हा मुख्य राहणार पोंभुर्णा तालुक्यातील असल्याने पोंभुर्णा पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद देशमुख हे हि कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी तिथे हजर झाले. अनेकांनी कंपनी प्रशासनाला मदतीची मागणी करुन हि कुठलाच प्रतिसाद कंपनी प्रशासनाकडून कडून न मिळाल्याने विनोद देशमुख यांनी भाजपचे स्थानिक पदाधिकारी युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना कैफियत सांगताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता क्षणाचाही विलंब न करता आकाश वानखडे यांनी रुग्णालय गाठले. काही वेळात झाडे कुटुंबियांच्या मदतीसाठी देवराव भोंगळे, महामंत्री नरेंद्र जिवतोडे, भारतीय युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, अक्षय नागपुरे हे दाखल झाले.
कंपनी प्रशासनासोबत चर्चा करून कंपनी प्रशासन न मानल्याने व कुठलाही तोडगा न निघाल्याने सायंकाळी ८ वाजता पासून जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महामंत्री नरेंद्र जिवतोडे, विवेक बोढे, अक्षय नागपुरे यांच्या नेतृत्वात कंपनीची वाहतूक रोखण्यात आली. रात्रीचे १० वाजून गेले पण प्रशासनाला जाग येईना म्हणून देवराव भोंगळे यांनी आकाश वानखडे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष यांना आदेश देवून खान बंद करण्यास सांगितले. त्या नंतर वानखडे व अक्षय नागपुरे यांच्या नेतृत्वात १०० ते १५० युवा कार्यकर्त्यांना सोबत घेवून रात्री १० वाजता पासून सकाळी ५ वाजे पर्यंत खान बंद करण्यात आली होती.
यावेळी खाणीचे उत्पादन व उत्खनन पूर्ण ठप्प झाले होते. आंदोलकांना अडविण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. त्यांना न जुमानता खान बंद पाडली. त्यानंतर झोपलेले कंपनी प्रशासन जागे झाले व मृतकाच्या कुटुंबियाला ५ लाख रुपयाची मदत देण्यात आली. त्यांनतर ०५ मे ला सकाळी ५ वाजता आंदोलन समाप्त करण्यात आले.
देवराव भोंगळे यांनी दाखवलेली समय सूचकता व त्या गरीब कुटुंबियाला मिळवून दिलेली मदत यामुळे झाडे कुटुंबियांच्या मदतीला धावून आला देवराव असे वयोवृद्ध व युवक म्हणतांना दिसत होते.
यावेळी नरेंद्र जिवतोडे, हरी सूर, राकेश बोमनवार , विवेक बोढे, आकाश वानखडे, अक्षय नागपुरे, विस्मय बहादे, सोमेश्वर आत्राम, स्वप्नील पिदुरकर, गणेश परचाके, पांडुरंग निब्रड, मंगेश मांगम, नितेश बानोत, गजू पाल, शेखर नागपुरे, वैभव नागपुरे, राहुल नागपुरे, राहुल निब्रड, साजन काळे, अतिश डोंगरे, प्रणय गोंडे, अभिजित भुसारी, दिनेश नागपुरे, मनोज नागपुरे, अमित पोतराजे, संतोष गोंडे, संजय नागपुरे, चैनाथ काकडे, अरविंद डोंगे, मंगेश पाल, गौरव गोंडे, सुजित डोंगे, आनंद थेरे, निखिल पिंगे, यश गोलाईत तसेच गावातील नागरिक उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने