बल्लारपूरात 6 वर्षीय मुलीवर अत्याचारचा प्रयत्न #ballarpur


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील दादाभाई नौरोजी वार्डात - राहणाऱ्या एका नराधमाने 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
38 वर्षीय एंथोनी फ्रांसवा याने शेजारी राहणाऱ्या 6 वर्षीय मुलीला खर्रा आणण्यासाठी पाठविले, खरा देण्यासाठी ती चिमुकली त्या आरोपीच्या घरी जाताच त्याने संधी साधत त्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
सदर संतापजनक घटना 3 मे ला घडली होती, घटनेच्या दिवशी मुलीचे आईवडील घरी नव्हते, सायंकाळी जेव्हा मुलीचे आईवडील घरी आले असता त्या चिमुकलीने घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आई वडिलांनी तात्काळ बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठत यासंदर्भात तक्रार दाखल केली, पोलिसांनी आरोपी एंथोनी फ्रांसवा याला अटक करीत पोक्सो अंतर्गत कलम 376 A, B दाखल केला, पुढील तपास पोउपनी नेहा सोळंके करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत