नारंडा येथे विद्युत विभागाच्या समस्येसंदर्भात आढावा बैठक
कोरपना:- कोरपना तालुक्यातील मौजा नारंडा येथील विद्युत विभागाच्या समस्येसंदर्भात उपविभागीय अभियंता इंदूरकर साहेब व कनिष्ठ अभियंता होकाम साहेब,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने व पोलीस पाटील नरेश परसुटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने नारंडा गावातील विद्युत समस्येबाबत चर्चा करण्यात आली,नारंडा गावातील विद्युत ताराची उंची वाढविणे,नारंडा गावातील विद्युत पुरवठ्याच्या दाब वाढविणे,गजानन चतुरकर यांच्या शेतातील कृषी पंपाची नवीन डीपी तात्काळ बसविणे,तसेच गावातील विविध घरांवतील तार हटविणे इत्यादी विषयांवर चर्चा करून लवकरात लवकर सदर समस्या सोडवा अशी मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केली.
यावेळी सदर सर्व कामे आपण लवकरात लवकर पूर्ण करू असे यावेळी उपविभागीय अभियंता इंदूरकर साहेब यांनी आश्वासन दिले.
यावेळी सदर सर्व कामे आपण लवकरात लवकर पूर्ण करू असे यावेळी उपविभागीय अभियंता इंदूरकर साहेब यांनी आश्वासन दिले.