चंद्रपूर शिवसेना महिला जिल्‍हा संघटकपदी उज्ज्वला ‍नलगे #Chandrapur #shivsena


चंद्रपूर:- मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने चंद्रपूर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्‍हा संघटकपदी उज्ज्वला प्रमोद नलगे यांची नियुक्‍ती करण्यात आली.
येत्‍या काळात होऊ घातलेल्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्या निवडणुका लक्षात घेऊन त्यांची नियुक्‍ती करण्यात आलेली आहे. उज्ज्वला ‍नलगे यांच्याकडे आधी तालुका संघटक पद होते. त्‍यांच्या कार्याची दखल घेत त्‍यांची जिल्‍हा संघटकपदी (चंद्रपूर, बल्‍लारपूर, राजुरा विधानसभा क्षेत्र) नियुक्‍ती करण्यात आली. त्‍यांच्या नियुक्‍तीबद्दल जिल्‍हा प्रमुख संदीप गिर्हे, पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख तथा शिवसेना प्रवक्‍ता शिल्‍पा बोडखे तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत