ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थीनीचा सत्कार.

ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थीनीचा सत्कार.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राजुराचे स्तुत्य उपक्रम.


राजुरा:-  राजुरा तालुक्यातील बामनवाडा सारख्या लहानशा गावातील विद्यार्थीनी ललीता ताराचंद टाकभौवरे - करमनकर यांनी ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परीक्षेत प्राविण्य प्राप्त करीत महाविद्यालयाचे, कुटुंबाचे, गावचे, समाजाचे नांव उंचाविल्यामुळे त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राजुरा तर्फे सत्कार करण्यात आले.


     त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राजुरा चे मार्गदर्शक प्रा. अनंत डोंगे सर, अध्यक्ष ॲड. राहुल थोरात, सचिव रत्नाकर पायपरे, कार्याध्यक्ष सतीश शिंदे, उपाध्यक्ष प्रवीण मेकर्तीवार, उपाध्यक्ष संतोष मेश्राम, संघटक जगतसिंग वधावन, कोषाध्यक्ष राकेश कलेगुरवार, सहसचिव संजय रामटेके, प्रसिद्धी प्रमुख अनिलकुमार गिरमिल्ला, प्रेस फोटोग्राफर रुपेश वाटेकर, सदस्य- संतोष देरकर, उज्वल भटारकर, वैभव धोटे, लोकेश पारखी, ओंकार आस्वले, कैलास कार्लेकर, अंकुश भोंगळे, गौरव कोडापे उपस्थित होते.
      पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे व जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे यांनी ज्युडीशनल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या ललीता ताराचंद टाकभौवरे - करमनकर या विद्यार्थीनीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत