समाजकार्याचे विद्यार्थी देत आहेत सामजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती #chandrapur


चंद्रपूर:- स्व.सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली,चंद्रपूर व इको-प्रो संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागांच्या योजनांची माहिती स्व.डॉ.वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांना दिनांक १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त प्रत्यक्ष तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून देण्यात आली.
समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल साकुरे सर यांच्या मार्गदर्शनात व प्रा.डॉ.जयश्री कापसे मॅडम,प्रा.डॉ.देवेंद्र बोरकुटे सर व इको-प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.बंडूभाऊ धोतरे यांच्या नेतृत्वात ही माहिती पोहोचविण्यात आली.
या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सामाजिक न्याय विभागाचे विद्यार्थ्यांनी विशेष आभार मानले.
या प्रसंगी युवराज बांबोळे,पूनम रामटेके,अंकीत बलकी,प्रतीक्षा मातेरे,चंदन मासरकर,योगेश मरसकोल्हे,पल्लवी तूपसुंदर, लक्ष्मी मेश्राम इत्यादी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत