Top News

चिंतामणी महाविद्यालयात सेवा निवृत्ती पर निरोप समारंभ व कर्मचारी सत्कार समारोह संपन्न #gondpipari


चंद्रपूर:- चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स, गोंडपिपरी येथील प्राचार्य डॉक्टर सी.ए. निखाडे सर यांचा सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ व कॉलेजला NAAC कडून B++ मानांकन मिळाल्याबद्दल कर्मचारी सत्कार समारोह आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमांची सुरुवात श्री चिंतामणी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री समर्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय प्राचार्य वसंतरावजी दोंतुलवार, वैभवजी दोंतुलवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. पाहुण्यांचे स्वागत व परिचय झाल्यानंतर निरोप समारंभाचे सत्कारमूर्ती प्राचार्य डॉक्टर सीए निखाडे, माजी प्राचार्य टी एफ गुल्हाने, यांचा सत्कार व सन्मान श्री स्वप्निलजी दोंतुलवार, यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमात प्राध्यापक प्रवीण रामटेके सर यांनी प्राचार्य डॉक्टर सी. ए.निखाडे सर सोबत कार्य करत असताना चे काही प्रसंग, आठवणी सांगून आपले भावना व्यक्त केले. डॉक्टर मोहन वाडेकर सर यांनी आपले वर्गमित्र निखाडे सर यांच्या बद्दल कॉलेजमध्ये शिकत असताना पासून ते आत्तापर्यंतचे सोबत घालवलेले काही क्षणांना आपल्या दिलखुलास शायरीतुन भावना प्रकट केल्या.
या कार्यक्रमात माजी प्राचार्य डॉक्टर डी बी भोंगडे सरांनी निवृत्तीनंतरचे जीवन सुखी समाधानाने जगावं व राहिलेल्या गोष्टी, निखाडे सर यांनी पूर्ण कराव्यात असे मत मांडले. तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीत प्राचार्य यांच्या योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. श्री समीर केने यांनी निखाडे सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन महाविद्यालयाचे नाव उंचावण्यासाठी प्राचार्य,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे असे मत मांडले.
डॉक्टर गौरीशंकर पराशर यांनी कॉलेजच्या शैक्षणिक प्रगती मध्ये संस्थेची मुख्य भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले.
 डॉक्टर सीए निखाडे यांनी आपल्या मनोगतातून प्राध्यापक ते प्राचार्य असा 37 वर्षाच्या कार्यकाळातील काही उतार-चढाव, महत्त्वाचे प्रसंग आठवणी  सांगितले. श्री अभिजीत चक्रधर निखाडे यांनी आपल्या वडिलांचे आतापर्यंत शिक्षण क्षेत्रातील कार्य संस्थेविषयी सरांचे प्रेम आणि आपल्या शैक्षणिक यशात वडिलांचे मार्गदर्शन, काही आठवणी सांगून आपले मनोगत व्यक्त केले.
चिंतामणी कॉलेज गोंडपिंपरी यांना NAAC प्रक्रियेमध्ये मदत करणारे चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स आर्ट्स,कॉमर्स, पोंभुर्णा, घुगुस   गोंडपिंपरी येथील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांकडून करण्यात आला. चिंतामणी परिवारातील  पोंभुर्णा, घुगुस, गोंडपिपरी कॉलेज, तसेच निसर्ग सखा संस्था, गोंडपिपरी चे अध्यक्ष श्री दीपक वांढरे यांच्या कडून प्राचार्य डॉक्टर सी. ए. निखाडे सर यांना भेट वस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला अध्यक्षीय समारोपात डॉक्टर विजय आईंचवार यांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाण परिषद याचे महत्त्व पटवून दिले तसेच प्राचार्य निखाडे सरांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन कॉलेजला कडून बी ++ ग्रेड मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
 या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर विजय आईंचवार, गोंडवाना विद्यापीठाचे पहिले माजी कुलगुरू, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गौरीशंकर पराशर माजी प्र-कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, डॉक्टर डी बी भोंगडे,सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा, श्री समीर केने, माजी व्यवस्थापन समिती सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, श्री स्वप्नीलजी दोंतूलवार, सचिव श्री समर्थ शिक्षण संस्था आहेरी, श्री मनीष पोतनुरवार, सहसचिव चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स बल्लारपूर, श्री प्रशांत दोंतूलवार, सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, तसेच चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स,  चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स, पोंभुर्णा, चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स,गोंडपिंपरी येथील सर्व प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, काही विद्यार्थी, प्राचार्य डॉक्टर सीए निखाडे सर यांचा परिवार हे उपस्थित होते.
 हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक डॉक्टर आशिष चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व विभागाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संजय सिंग यांनी केले.
प्राध्यापक महेंद्र अक्कलवार यांनी प्राचार्य नीखाडे सर यांचा संपूर्ण परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्राध्यापक शरद लखेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक पुनम चंदेल यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने