Top News

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजयुमोचे जिल्ह्याभरात आंदोलन #chandrapur


पेट्रोल व डिझेल वरील टॅक्स कमी करून जनतेला दिलासा द्या अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल:- आशिष देवतळे
चंद्रपूर:- केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर सलग दोनदा कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला परंतु अजूनही महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेल वरील लागणारा कर हा क्वचित हि कमी न करता तटस्थ भूमिका घेत जनतेची पिळवणूक करण्याचे कार्य महाराष्ट्राची महा विकास आघाडी सरकार करत आहे यावर आळा घालण्याकरीता संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे लोकनेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहीर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण 15 तालुक्यात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आले व स्थानिक तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व आंदोलनाच्या माध्यमातून या झोपलेल्या सरकारला चेतावणी दिली की जर पेट्रोल,डिझेल वरील लागणारा महाराष्ट्र सरकारचा टॅक्स लवकरात लवकर कमी केला नाही तर येत्या काही दिवसात हे आंदोलन उग्र स्वरूपात घेण्यात येईल अशी चेतावणी आजच्या आंदोलनातून देण्यात आली सोबतच आज बल्लारपूर शहरात देखील आंदोलन घेण्यात आले.
नगरपरिषद चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला व त्यानंतर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशीष देवतळे यांनी केले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत भाजयुमो जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, भाजपा अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष शेख जुम्मन रिजवी, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मोहित डंगोरे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे, बबलु गुप्ता,शहर महामंत्री घनश्याम बुरडकर,गोलू सचदेवा, आबिद भाई,राजू निषाद,विकी बहुरिया,संजय निषाद,प्रदीप केशकर,शंकर मोहदरे,प्रणय बोडे,चेतन पाल,मूलचंद वर्मा,श्रीकांत उपाद्याय,मौला निषाद,आकाश शर्मा,शिवम वाघमारे,महेश अंसारी,महेंद्र पेराल,नीरज दुबे,पीयूष मेश्राम,गणेश कुंडे तसेच युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रम्हपुरी

पोंभुर्णा

नागभीड
कोरपना

वरोरा

गोंडपिपरी
राजुरा

चिमूर

भद्रावती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने