Top News

विश्वासघाती महाविकास आघाडी सरकारचा केला धिक्कार #chandrapur

महाविकास आघाडी सरकारचा खोटारडे पणा झाला उघड!

एकही रुपया राज्य सरकारने कमी केला नाही:- विशाल निंबाळकर

चंद्रपूर:- राज्य शासनाने दारू वरील टॅक्स कमी केला पण पेट्रोल डिझेल वरील राज्य सरकारचा टॅक्स कमी केला नाही.हा जनतेवर अन्याय असून पेट्रोल व डिझेल वरील टॅक्स 50% नी कमी करावा,अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे बुधवारी 25 मे ला दु.4 वाजता गांधी चौक येथील एल्गार आंदोलनात भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केली.
🆗
लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो जिल्हाध्यक्ष (श) विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महामंत्री, सुनील डोंगरे,मंडळ अध्यक्ष 
 संजय पटले, हिमांशू गादेवार, गजेंद्र भोयर, कुणाल गुंडावार, पप्पू बोपचे , स्नेहित लांजेवार, आकाश म्हस्के, राहुल पाल, रुपेश चहारे, राजेश यादव, प्रवीण उरकुडे, आकाश ठुसे , प्रणय डंभारे, सतीश तायडे, मनीष पिपरे,रोशन माणूसमारे, विकी मेश्राम, किशोर भोपेय, बंडू गौरकार, सचिन गौरकर, सौरव मेश्राम, शिवम कपूर, बिपिन निंबाळकर, अखिलेश रोहिदास,अजित खान पठाण, रामजीत यादव, अमन वाघ, श्रीकांत दडमल, शिवम सिंग, बंटी चौधरी, रोहित मडावी, विनय गेडाम, राहुल पटले,संदीप भाऊ रत्नपारखी, गणेश रास पाहिले, मनीष रासपाइले, शुभम निंबाळकर, महेश कोलावार,दीपक हूड, राकेश टेम्भूरकर, महेश मुंधंडा यांची उपस्थिती होती.
🆗
निंबाळकर म्हणाले,दारूवरचा कर कपात 50% 'मग राज्य सरकार पेट्रोल व  डिझेल वरच्या करात कपात का करत नाही?हे तर दारुड्यांसाठी चे सरकार आहे.केंद्र सरकारने जे करून दाखवले ते आता,राज्य सरकार करावे.नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या विश्वासघातकी आघाडी सरकारचा धिक्कार सर्व जनतेनी करावा असेही आवाहन त्यांनी केले.
🆗
केंद्र सरकारचा टॅक्स आता फक्त - 19 रु
परंतु,राज्य सरकारचां टॅक्स - 29रु असल्याने ईंधन दरवाढ कुणामुळे?याचा जनतेनी विचार करावा.महाविकास आघाडी सरकारचा खोटारडेपणा  उघड झाला असून
एकही रुपया राज्य सरकारने कमी केला नाही.म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी युवक युवतींनी एकत्र झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने