🌄 💻

💻

राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील टॅक्स कमी करावा- भाजयुमो राजुराची मागणी

मा.जिल्हाधिकारी यांना तहसीलदार राजुरा मार्फत निवेदनाद्वारे केली मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात 
राजुरा:- पेट्रोल व डिझेल वरील लागणार टॅक्स हा केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांचा वेग - वेगळा असतो,नागरिकांना पेट्रोल व डिझेल यांच्या दरामध्ये कमी व्हावी याकरिता केंद्र सरकारने सलग अनेकदा टॅक्स कमी केले, परंतु राज्य सरकारने अजिबात टॅक्स कमी न केल्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा राजुरा तर्फे मा.जिल्हाधिकारी यांना तहसीलदार राजुरा मार्फत निवेदन देण्यात आले व राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील टॅक्स कमी करण्याची मागणी केली.


महाराष्ट्र सरकारची डिझेल व पेट्रोल वरील टॅक्स कमी करण्याची जबाबदारी असून सुद्धा राज्य सरकार फक्त केंद्र सरकार वर बोट दाखविण्याचे सातत्याने महाविकास आघाडी सरकार करत आहे,महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारने टॅक्स कमी करून वाढलेल्या किमती कमी करावे व जनतेला दिलासा देण्यात यावे अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी तहसीलदार राजुरा यांना निवेदन देण्यात आले, याप्रसंगी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, भाजयुमोचे दिलीप गिरसावळे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार, अनिल खनके, विलास खिरटकर, छबिलाल नाईक, योगेश येरणे, हरीश ब्राम्हणे, ज्ञानेश्वर चौधरी, प्रदीप बोबडे,  सुधीर अरकीलवार, अजयकुमार श्रीकोंडा आदी भाजयुमो कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत