💻

💻

विरुर पोलिस स्टेशन ठाणेदारच्या मदतीने बगलवाही गावाला भेटले पिण्याचे पाणी #RAJURA

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा

राजुरा:- उन्हाच्या दिवसात पाण्याने तळमळत असणारे विरुर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बगलवाही गावाला विरुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल चव्हाण व पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली.
 शासकिय सेवेत रुजु असुन सुद्धा सामाजिक आपुलकी जोपासत पोलिस उपनिरीक्षक चव्हाण साहेब यांनी बगलवाही गावाच्या बोरवेलला हातपंप बसवुन बगलवाही गावाला पाणी पाजण्याचे श्रेय घेतले व नविन बोरवेल हातपंप यांच उद्घाटण करण्यात आले सोबतच छोटासा वृक्ष रोपण कार्यक्रम घेण्यात आले. यात वेगवेळे पुला-फळाचे झाड लावण्यात आले.
यावेळी विरूर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक चव्हाण साहेब लक्कडकोट बिटचे मेजर नरगेवार विहीरगांव बिटचे मेजर श्री पवार साहेब मुंडे सर व विरूर पोलीस स्टेशन चे सर्व पोलिस कर्मचारी बगलवाही गावचे पाटिल भोजु आत्राम कोष्टाला चे पोलीस पाटिल महादेव बूजाडे लक्कडकोट येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाधव उमेद अभियान बचत गटाच्या कार्यकर्त्या सौ. शिला दिलीप जाधव व बगलवाही येथील महीला,पुरुष यांची उपस्थिती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत