Top News

खेळांमुळेच आत्मविश्वासात वृद्धी:- राजेश नायडू #chandrapur

सरदार पटेल महाविद्यालय येथे निशुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागव्दारे एक माह क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दिनांक १ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉल खेळाडू राजेश नायडू यांचे शुभ हस्ते पार पडले.


उद्घाटन प्रसंगी राजेश नायडू शिबिरार्थींना मार्गदर्शन करतांना म्हणाले की खेळ आपल्याला अनुशासन शिकवते, खेळाडूंनी आपल्या खेळाप्रती आदर ठेवावा व प्रत्येक खेळाडूंनी खेळ खेळतांना आपले ध्येय निश्चित करावे व आपल्या गोल पर्यंत पोहचावे. खेळांमुळेच आपल्याला जीवनात संकटमय परिस्थितीचा कोणताही ताणव न बाळगता सामना करता येते. खेळ आपल्याला बरेच काही शिकवते म्हणून खेळाडूंमुळे आपला आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक खेळाडूंनी निर्व्यसनी रहावे व अशाप्रकारच्या शिबिराचा लाभ घेऊन उच्चस्तरीय स्पर्धेकरिता सहभाग घ्यावा असा सल्ला दिला.

या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विजय ए. सोमकुंवर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव प्रशांत पोटदुखे म्हणाले की समाजातील काही विद्यार्थी हे क्रीडा शिबिराचा आर्थिक परिस्थितीमुळे सहभागी होऊ शकत नाही अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनी या निशुल्क शिबिराचा लाभ घ्यावा संस्था अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनसाठी सदैव प्रयत्नशील आहे. विद्यार्थिनींनी आनंदाने शिबिरात सहभागी होऊन अनुशासित राहावे, नियमित व्यायाम करावा व सदैव निरोगी रहावे अशा शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर आपले मत व्यक्त करतांना म्हणाले की मागील 13 -14 वर्षापासून आमचे महाविद्यालय दरवर्षी नि: शुल्क क्रीडा शिबिराचे आयोजन करीत असते याचा मुख्य उद्देश हा आहे. स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांचे स्वप्ना नुसार समाजातील विद्यार्थ्यांना विशेष क्रीडा शिबिराचा लाभ होऊन विद्यार्थी हा अनुशासित राहाव, निर्व्यसनी राहावं व सदैव निरोगी राहून राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार व्हावेत या उद्देश ठेवून या शिबिराचे आयोजन केले आहे. मागील दोन वर्षातील काळात कोरोनामय वातावरणात विद्यार्थी खेळाडू व मैदानापासून दूर राहिले आहेत म्हणून या वर्षी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे मनोगत व्यक्त केले.
     
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय ए. सोमकुंवर यांनी केले तर संचालन व आभार डॉ. कुलदीप गोंड यांनी केले. शिबिराचा अधिक माहिती करिता शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुंवर यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक. ९९६०४२९२३८ संपर्क करावा. शिबिर यशस्वी करण्याकरिता, चेतन इदगुरवार, कु. मयुरी चिमुरकर, नितीन घरत, सुरज परसुटकर, हनमंतू डंबारे, राजेश हजारे, साहील गोडघाटे व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शिबिरात व्हॉलीबॉल, योगा, बॅडमिंटन बॉल बॅडमिंटन, नेटबॉल, कराटे इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे.
     तसेच सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर (माजी आमदार), सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, कोषाध्यक्ष श्री मनोहर तारकुंडे, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान यांनी या शिबिराला प्रोत्साहित करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने