चंद्रपुरात मनसैनिकांनी केले हनुमान चालिसा पठण #Chandrapur


चंद्रपूर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण केले.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ६० ते ७० मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस पाठवून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाईसंदर्भात नोटीस पाठविली. त्यानंतर गुरुवारी सकाळच्या दरम्यान मनसे सैनिकांनी भोंगा न लावता शांततेत हनुमान चालिसा पठण तसेच आरती केली.
चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख, माजी नगरसेवक सचिन भोयर यांच्या उपस्थितीत भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यात सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत