पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य तात्काळ उपलब्ध करावे #chandrapur

Bhairav Diwase
आकाश संतोष मस्के जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यांची मागणी.
चंद्रपूर:- जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब लाभ योजनेतील शिधापत्रिकाधारकांना 2019 पासून धान्य पुरवठा होत, नाही आहे. यासंदर्भात दिनांक 1/4/2022 रोजी आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती.
🏫
आमदार सुधीरभाऊच्या आदेशाप्रमाणे तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे तसेच भारतीय जनता पार्टी महामंत्री राजेंद्रजी गांधी, ब्रीजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, रवी गुरनुले युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांचा मार्गदर्शनात दिनांक 5 /5/2022 ला शहरातील वंचित लाभार्थ्याचे अर्जासोबत कागदपत्रे जोडून जिल्हा अन्नधान्य पुरवठा निरीक्षक माननीय तुमबडे साहेब यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी भाजप युवा मोर्चाने धान्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी सर्व लाभार्थ्यांकडून विनंती करण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चा सचिव प्रवीण उरकुडे, मंडळ महामंत्री अखीलेश रोहिदास, बंडू गोरकार जी उपस्थित होते